उस्मानाबाद :- शहरातील राहणारे एबीपी माझाचे प्रसिद्ध कॅमेरामन काकासाहेब कांबळे यांचा आज 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी घरच्यांना ड्युटीवर सोडायला जाताना प्रवासात मोबाईल हरवला होता. पत्रकार , कॅमेरामन यांचा मोबाईल आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे साधन आहे काकासाहेब कांबळे यांचा मोबाईल हरवला असे लक्षात आल्यावर काही मिनिटे त्यांना 'सुचेनाच काय करावे' त्यानंतर त्यांनी आपल्या नंबरवर फोन लावला मोबाईल भेटलेल्या तरुनाने फोन उचलून सांगितले मी दहा मिनिटात तुमचा फोन आणून देतो मि कामात आहे.
मोबाईल भेटलेल्या व्यक्तीने काही मिनीटातच त्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचून मोबाईल परत केला मोबाईल परत करणारा व्यक्ती , तरुणाचे नाव फैजन कुरेशी आहे व तो उस्मानाबाद शहरातील आझाद चौक परिसरामध्ये राहतो अशी माहिती त्यांनी दिली.
फैजल कुरेशी यांच्या सारखे प्रामाणिक माणसे आज खूप कमी पाहायला मिळतात फैजल कुरेशीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, पण एक गोष्ट खरी आहे प्रामाणिक व्यक्तीला कधीच काही कमी पडत नाही व कधीही कोणत्याही अडचणीमध्ये मार्ग सोपा निघतो त्याचप्रमाणे काकासाहेब कांबळे सर्वांच्या मदतीला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून , कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेहमी सज्जे असतात