पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणे नंतर तुळजापुरकर ७ वर्षापासून प्रतीक्षेत - When will start Solapur tuljapur Osmanabad new railway line?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्णपीठ असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापुरला रेल्वेशी जोडन्याच्या घोषणेला ७ वर्ष पुर्ण झाली आहेत २०१४ साली निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती भुसंपादनाच काम पुर्ण झाल नसल्यामुळे देशातील तुळजाभवानी भक्तांना रेल्वेची अजुन किती दिवस वाट पहावी लागणार आहे
When will start Solapur tuljapur Osmanabad new railway line?
तुळजापुर तिर्थक्षेत्र असल्यामुळे भारताच्या नकाशावर तुळजापुर क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापुर येथे प्रचार सभे दरम्यान सोलापुरला- तुळजापुर रेल्वेने जोडणार अशी २०१४ मध्ये तुळजापूर येथील सभेत घोषणा केली प्रत्यक्षात २०१९ पर्यंत फक्त सोलापुर - तुळजापुर - उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला मंजुरी देत सर्व्हेसाठी निधीची तरतुद केली.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मार्गाचा आर्धा खर्च राज्य सरकार करेल असे पत्र रेल्वे विभागाला दिले होते फडणवीस यानी पत्र दिले परंतु निधीची तरतुद केली नसल्यामुळे या रेल्वे मार्गाची गती मंदावली आहे तर दूसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या रेल्वे मार्गासाठी बैठका घेवुन पाठपुरावा सुरु केलाय रेल्वे मार्गासाठी भुसंपादनासाठी वारंवार बैठका घेत आहे तर भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्र व्यवहार केला असून या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिला नसल्यामुळे परिवहन मंत्री यांच्या विरोधात येणाऱ्या अधिवेशनात विशेषअधिकार भंगाची सुचना विधी मंडळात दिली आहे.
तुळजापुर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे दरवर्षी लाखो भाविक मिळेल त्यावहानाने येत असतात त्यामुळे येथे रेल्वेची आवश्यकता आहे यामुळे भाविक अधिक येतील तुळजापुरला रेल्वेची मागणी जुनीच आहे तेव्हा केंद्र सरकारने लवकरात लवकर रेल्वे मंजुर करावी अशी मागणी तुळजापुरकर करत आहेत ट्विटरवर ट्विट करत लवकरच हे काम मार्गी लागणार आहे असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे तुळजापूर शहरातील एका नागरिकाने 'When will start Solapur tuljapur Osmanabad new railway line?' या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी खासदार ओमराजे यांना करत क्युट केले होते त्यामध्ये खासदार ओमराजे यांनी लवकरच या कामाचे भूसंपादन होणार आहे अशी माहिती दिली आहे