google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महाविकास सरकारच्या नाकर्तेपणाचा आम्ही जाहिर निषेध करीत असुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणबाबत राज्य सरकारने कुठलीही भुमिका अद्याप पर्यंत ठोस पणे स्पष्ट घेतली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले - भाजप

महाविकास सरकारच्या नाकर्तेपणाचा आम्ही जाहिर निषेध करीत असुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणबाबत राज्य सरकारने कुठलीही भुमिका अद्याप पर्यंत ठोस पणे स्पष्ट घेतली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले - भाजप

0

महाविकास सरकारच्या नाकर्तेपणाचा आम्ही जाहिर निषेध करीत असुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणबाबत राज्य सरकारने कुठलीही भुमिका अद्याप पर्यंत ठोस पणे स्पष्ट घेतली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले



 ( लोहारा :-  इकबाल मुल्ला )
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द सरकारच्या उदासीनता नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने जाहिर निषेध करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास सरकारच्या नाकर्तेपणाचा आम्ही जाहिर निषेध करीत असुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणबाबत राज्य सरकारने कुठलीही भुमिका अद्याप पर्यंत ठोस पणे स्पष्ट घेतली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. या सरकारने या आरक्षणासाठी गेली 15 महिने झाली मागासवर्गीय आयोग नेमला नाही. व केंद्र सरकारला वारंवार नावे ठेवत आरक्षणाबाबत उदासिनता दाखवून या आयोगाला या महाविकास आघाडी सरकारने पैसे हि दिले नाही. कुठलाही इम्पोरियल डाटा गोळा केला नाही. या सर्व बाबींमुळे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे हे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. यामुळे या महाविकास सरकारचा भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका यांच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष कैलास दादा शिंदे, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हतरगे, नेताजी शिंदे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, बाबा सुंबेकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top