उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण ओमीक्रॉनचे
उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यात याअगोदर ओमीक्रॉनचे ३ रुग पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर गाना देशातून आलेल्या 31 वर्षीय पुरुषाची व घरातील इतर व्यक्तींची तपासणी नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते त्यामध्ये गाना देशातून आलेल्या 31 वर्षे पुरुष व घरातील दोन वर्षाचा एक लहान मुलगा पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात पहिले सापडलेले तीन व हे दोन मिळून असे पाच रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी एकजण ओमीक्रॉन मुक्त झाले आहे व डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात आज पर्यंत covid-19 मध्ये पॉझिटिव आलेल्या रुग्णांची संख्या ६७ हजार ६३९ आहे त्यामध्ये जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या १५०७ आहे व जिल्हाबाहेरील रुग्णालयात झालेले मृत्यू व जिल्हाबाहेर स्थायीक झालेल्या लोकांचे मृत्यू ची संख्या ३६० आहे तर इतर कारणामुळे ( हृदयरोग दमा , कॅन्सर , यकृताचा आजार फुफ्फुसाचा आजार इ . ) झालेले मृत्यची संख्या १०७ आहे , कोविड-१९ बरा झाल्यानंतर झालेल्या मृत्यू झालेल्या रुग्ण संख्या १०८ आहे जिल्ह्यात उपचारा घेत असलेले संख्या ९ आहे .
नागरिकांनी लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे