लग्न करून अंगावरील सोने घेऊन पत्नी फरार , फसवणूकीचा गुन्हा दाखल
येरमाळा पोलीस ठाणे : शेलगाव (ज.), ता. कळंब येथील सुनिल विष्णु तवले यांचे लग्न जमवण्यासाठी कुंभारी, ता. सोलापूर (दक्षिण) येथील सुरेश खेत्री यांनी सुनिल यांच्याकडून 20,000 ₹ घेउन अजनळे, ता. ईडी, जि. विजापूर, राज्य- कर्नाटक येथील भाग्यश्री पांडुरंग मोरे यांच्याशी सुनिल यांचा दि. 06.11.2021 रोजी चडचण, जि. विजापूर येथे साखरपुड केला. यानंतर भाग्यश्रीची आई आजारी असल्याचे कारण सांगूण तीच्या उपचारासाठी मध्यस्थी सुरेश खेत्री वेळोवेळी पैसे मागत होते.
यानंतर दि. 09.11.2021 रोजी चडचण येथे सुनिल व भाग्यश्री यांचा विवाह झाल्यानंतर भाग्यश्री या दि. 10.12.2021 रोजी 03.00 वा. सु. शेलगाव येथील तीच्या माहेराहुन कोणास काही एक न सांगता अंगावरील सोने- चांदीच्या दागिन्यांसह निघून गेल्या.
पती- सुनिल तवले यांनी पत्नी- भाग्यश्री हिस वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. यावरुन सुरेश खेत्री व भाग्यश्री मोरे या दोघांनी आपली फसवणूक केल्याचे सुनिल तवले यांना समजले. अशा मजकुराच्या सुनिल तवले यांनी दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.