बेंबळी पोलीस ठाणे : प्राथमिक आरोग्य केंद्र, पाडोळी येथील परिचारीका- संगीता शेटे व रुग्णवाहिका चालक- नितीन घोडके हे दि. 21.12.2021 रोजी 09.30 वा. सु. कर्तव्यावर होते. यावेळी पाडोळी ग्रामस्थ- शिवाजी सुगन कांबळे, वाघा माणिक गायकवाड, बंडू अशोक कांबळे, शंकर सुगन कांबळे, कुंडलिक मिसाळ, लखन कांबळे या सर्वांनी त्यांच्या नातेवाईकास आरोग्य केंद्रावर उपचारार्थ नेउन मोठमोठ्याने आरडाओरड करुन नितीन घोडके यांना शिवीगाळ करुन मारहान केली. तसेच संगीता शेटे यांसह त्यांच्या सहकाऱ्यांस उध्दटपने बोलून त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी- बालाजी शेरखाने यांनी सरकारतर्फे दि. 22 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 186, 143, 147, 149, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“