म्हाडा'ची परीक्षा अचानक रद्द; मंत्री आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडिओ पोस्ट करत दिल्याने भाजयुमो ने केला निषेध

0


'म्हाडा'ची परीक्षा अचानक रद्द; मंत्री आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडिओ पोस्ट करत दिल्याने भाजयुमो ने केला निषेध

उस्मानाबाद :-  'म्हाडा'ची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची रात्री 2 वाजता ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यावेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहचली होती विद्यार्थ्यांना ही माहिती समजता धक्का लागला व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थी स्वखर्चाने एसटी बंद असताना,घे भल्या तिकिटाने खाजगी वाहनाने फोहचून हजर झाले होते. ही गोष्ट युवा मोर्चाच्या लक्षात आली असता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात  युवा मोर्चाने तुळजापूर येथे या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष बोलले,सरकारची निष्क्रीयता पोरांच्या जीवाचं खेळणं करणारी आहे. पोरांच्या स्वप्नाशी खेळण्याचं पाप कुठ फेडाल. दिलेल्या तारखेत सरकार परिक्षा घेऊ शकत नाहीत, तुम्ही राज्य चालवता का गावगाडा? हे सरकार नुस्तं वसुली करण्यात व्यस्त आहे. हे सरकार विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे अश्या खोचक शब्दांत सरकारवर टीका केली.

यावेळी आनंद कंदले,दयानंद मुडके, दिनेश बागल,राम चोपदार, सागर पारडे, विशाल पाटील,सुरज शेरकर, स्वप्नील नाईकवाडी ,कुलदीप भोसले,  राजेश्वर कदम व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top