सारोळा बु. येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कोविड योध्दा कार्यगौरव पुरस्काराचे वितरण
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा बु येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कोविड योध्दा कार्यगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे हा कार्यक्रम गावातील मारूतीच्या मंदिरात ठेवण्यात आला होता तसेच गावात १०० टक्के लसीकरण झाले आहे.
कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य विभाग,शिक्षक, शिक्षिका,आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका,गावाचे पोलिस पाटील,ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचा गौरव सन्मान चिन्ह,कोविड योध्दा प्रमाणपत्र,शाल व श्रीरळ फेटे बांधून या सर्व कोविड योध्दांचे सन्मान करण्यात आला.
कोविड योध्दा पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अर्चना पाटील तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तायडे यांच्या हस्ते देण्यात आला आहे
यावेळी गावाचे सरपंच प्रशांत रणदिवे,ग्रा.प.सदस्य सुधाकर देवगिरे, दलितमित्र पांडूरंग कठारे, रमेश रणदिवे, ग्रामसेवक योगेश मुंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य शामसुंदर सारोळकर,अमर बाकले,अशोक परीट,ज्योतीराम रणदिवे,पोपट पाटील, शशिकांत परीट, मुरलीधर कठारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक होनकळस ,मुंडे सर पोलिस पाटील प्रतिम कुदळे,एसएसपी संस्थेच्या मुजावर,ग्रा.कर्मचारी शैलेश शिंदे पांडूरंग रणदिवे,दत्ता बगाडे,शौला सरगुले,आरोग्य सहाय्यक शेटे तसेच गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते