चालक पोलीस शिपायी भरती प्रक्रीया- 2019 संदर्भात उमेदवारांस सुचना
( Notice to Candidates regarding Driver Police Peon Recruitment Process- 2019 )
उस्मानाबाद :- पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद ( osmanabad police ) येथील आस्थापनेवरील रिक्त चालक पोलीस शिपायांच्या 33 जागांकरीता प्रत्येकी 1:10 उमेदवार या प्रमाणात लेखी परिक्षेतून पुढील निवड प्रक्रियेस पात्र उमेदवार निवडण्यात आले असून त्याचा निकाल दि. 23.11.2021 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
नमूद उत्तीर्ण उमेदवारांच्या निवडीची उर्वरीत प्रक्रीया विविध प्रमाणपत्रांची तपासणी, उमेदवाराची उंची, छाती व वाहन चालवण्याचे प्राविण्य इत्यादी विषयक प्रक्रिया दि. 11.01.2022 रोजी पासून सकाळी 05.00 वा. पासून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील मैदानावर राबवली जाणार आहे. या प्रक्रियेस प्रतीदिन बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती उस्मानाबाद पोलीस दलाच्या www.osmanabadpolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर यापुर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी संबंधीत पात्र उमेदवारांनी ठरवून दिलेल्या दिवशी उपरोक्त ठिकाणी व वेळेत खालील कागदपत्रांसह हजर रहावे. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांनी उमेदवारांस केले आहे.
- एसएससी, एचएससी, नॉनक्रिमीलेयर, जात, डोमीसाईल, ईडब्ल्युएस प्रमाणपत्रांसह खेळाडू असल्यास खेळाडू पडताळणी प्रमाणपत्र, गृहरक्षक दल प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांच्या मुळ प्रतीसहीत छायांकीत प्रती.
- उमेदवाराची मुळ ओळखपत्रे (आधार, पॅन, वाहन चालक परवाना, मतदान कार्ड इत्यादी.)
- आवेद अर्ज (रंगीत प्रत), प्रवेशपत्र / हॉल तिकीट (रंगीत प्रत.)
- उमेदवाराचे पासपोर्ट प्रकाराची 4 रंगीत छायाचित्रे.
( Notice to Candidates regarding Driver Police Peon Recruitment Process- 2019 )