google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 वसंतराव नाईक महामंडळाच्या थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत - OneTime Settlement

वसंतराव नाईक महामंडळाच्या थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत - OneTime Settlement

0

उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना 25 हजार रुपये थेट कर्ज योजना आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळाच्या  योजनेंतर्गत वाटप केलेल्या कर्जाची वसुली अत्यल्प असल्यामुळे या कर्ज वसुलीत वाढ होण्याच्या दृष्टीकोणातून तसेच सध्याची कोविड-19 सारख्या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता,

विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या लाभाथ्याकडे महामंडळाची थकीत असलेली कर्ज वसुलीत वाढ होण्यासाठी (OneTime Settlement ) योजना राबविणे आवश्यक असल्यामुळे  थकीत कर्जावरील व्याजामध्ये एक रक्कमी समझोता 50 टक्के सवलत (माफी) लागू करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.


जिल्हयातील वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
                                       ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top