उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- नवी दिल्ली येथील केंद्रीय सैनिक बोर्ड, रक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2021-2022 करीता प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनासाठी (Prime Minister's Scholarship )
(प्रथम वर्ष) साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा यांनी त्यांच्या पात्र पाल्यांचे अर्ज www.ksb.gov.in या वेबसाइटवर भरून त्याची प्रिंट प्रत (printed copy) तात्काळ येथील जिल्हा सैनिकी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
****