उस्मानाबाद,दि.25(जिमाका ) :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (पी एम किसान) फेब्रुवारी 2019 पासून सुरु आहे. पात्र शेतक-यांना दरवर्षी रक्कम रुपये सहा हजार रुपये बँक खात्यात अनुदान जमा केले जाते. या योजनेचा निधी वितरण PFMS प्रणाली मार्फत करण्यात येत आहे.ज्या लाभार्थ्यांचे बॅक खाते आधारशी जोडले नाही त्यांनी ते काम करुन घ्यावे, असे आवाहन उस्मानाबादच्या तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.
या PFMS प्रणालीमध्ये पात्र लाभार्थ्याचे आधार क्रंमाक बँक खाते क्रंमाक, IFSC CODE आणि मोबाईल क्रमांकाचा डाटा एंट्री अचूक असणे आवश्यक आहे. मात्र काही लाभार्थ्याचे खाते क्रंमाक आणि तपशिल दोष पूर्ण असल्यामुळे,आधार क्रंमाकाशी चालू बँक खाते लिंक नसल्यामुळे,बँक खाते बंद असणे आणि इतर कारणांनी अनुदान जमा करण्यास PORTAL मध्ये अडचण येत आहेत.
सर्व पात्र लाभार्थी ज्यांचे पी एम किसान अनुदान मिळण्यास अडचण येत आहेत. त्यांनी चालू बँक खाते ज्या बॅकेंत आहे, त्या बॅकेतून खात्याला आधार जोडणी करुन घ्यावी जेणेकरुन ADHAR PAYMENT MODE असणाऱ्या सर्व लाभार्थ्याना अनुदान त्यांच्या खात्यावर आपोआप जमा होण्यास मदत होईल.अशा लाभार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात येण्याची अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
काही बॅकेचे विलीनीकरण दुस-या बँकेत झालेले आहे. अशा बँकेच्या खातेदार लाभार्थ्यांनीही तात्काळ आपल्या नवीन बँक शाखेत जाऊन आपल्या खात्यास आधार जोडणी करुन घ्यावी. जेणेकरुन अशा सर्व लाभार्थ्यांचे अनुदान जमा होईल.तसेच सर्व पी एम किसान पात्र लाभार्थी यांना पी एम किसान पोर्टलवर FARMERS CORNER मध्ये जाऊन आपली E Kyc करणे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे. याद्वारे सर्व लाभार्थ्यांनी या सुविधा पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध होताच जवळच्या CSC केंद्रावरुन ADHAR BASED EKYC करुन घ्यावी. आपले अनुदान विनाव्यत्यय सुरु राहील याची नोंद घ्यावी.असे उस्मानाबादचे तहसीलदार यांनी कळविले आहे.