विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

0

उस्मानाबाद :- विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ११ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या भर चौकामध्ये अज्ञात इसमाने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांमध्ये जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांची हत्या करण्यात आलेली आहे 

अमरावती शहरांमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा व मातंग समाजाची अस्मिता डॉ.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जाणीवपूर्वक प्रशासनाने व शासनाने हटवला तो तात्काळ बसविण्यात यावा डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन अध्यक्ष विकास त्रिवेदी  यांनी जाणीवपूर्वक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समाजसुधारक प्रबोधनकारांच्या यादी मध्ये नाव नसल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे त्याला तात्काळ निलंबित करावे उस्मानाबाद शहरांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नियोजित जागेत करावा व क्रांतीवीर लहुजी साळवे चौकाचे सुशोभिकरण करण्यात यावे मातंग समाजावरील महाराष्ट्रात होणारे अन्याय व अत्याचार थांबवावेत या मागण्याच्या संदर्भात लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद यांच्या वतीने वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे धरून निदर्शने करत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले


  जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड कार्याध्यक्ष संतोष मोरे धनंजय वाघमारे विजय क्षीरसागर निखील चांदणे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top