राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागरण समितीने केले सुचनाचे निवेदन सादर

0


उस्मानाबाद :- दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक विभागाच्या आयोजित कार्यक्रमात मतदार जनजागरण समिती उस्मानाबाद यांनी मुख्य निवडणुक आयोगाला काहि सुचना सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार गणेश माळी  यांच्या मार्फत निवेदनाद्वारे कळविण्यात आल्या.

आज दिनांक 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपणास शुभेच्छा देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे आपल्या कार्यकाळात झालेल्या निवडणुका आपण यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत व मतदारांचे जनजागरण करून मतदानाचा टक्का वाढविण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केला आहे याबद्दल आम्हाला समाधान वाटते निवडणुकीच्या काळात नैतिक जबाबदारी म्हणून आम्हीदेखील मतदारांनी मतदान करावे याकरिता मतदार जनजागृती साठी, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केलेला आहे तरीही काही बाबी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी काही सूचना आहेत या माध्यमातून करीत आहोत,१) स्मार्ट कार्ड फायबर मतदान ओळखपत्र बऱ्याच मतदारांना मिळालेले नाहीत ते मिळणे गरजेचे आहे.

२) मतदान ओळखपत्र ओळखपत्रासह आधार कार्ड लिंक करावे यामुळे मनुष्यबळाची संख्या कमी होऊन पोलिंग एजंट नेमण्याची गरज पडणार नाही.
३) दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

४) मतदान केंद्रावर कर्तव्य बजाविणाऱ्या अधिकाऱ्यास मतदान केंद्रातील प्रशिक्षण परिपुर्ण द्यावे त्यामुळे मतदारांची हेळसांड होणार नाही.

५) मतदाराकडे मतदान ओळखपत्र असतांना मतदार यादीत नाव सापडत नसल्याकारणाने मतदार मतदानापासुन वंचित राहिले जातात त्यामुळे मतदान केंद्रावरच मतदान ओळखपत्र आधारे मतदार यादीत नाव समक्ष समाविष्ट करून घेण्यात यावे.

६) मतदान यंत्राद्वारे मतदान केल्यानंतर छापील पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी.

७) कोव्हिड-१९ च्या संसर्गामुळे मतदार केंद्रावर मतदारासाठी सॅनिटायझर ची व्यवस्था करावी व सामाजिक अंतर ठेवण्याची व्यवस्था करावी.

९) आपल्या कार्यकाळात होणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस उमेदवाराच्या प्रचार फेरी व जनसभा आदि कार्यक्रमात उपस्थितांवर कोव्हिड-१९ नियमावलीनुसार नियंत्रण ठेवावे.

या सर्व बाबी अंमलात आणल्या गेल्यास मतदान सुलभ व निर्भयपणे होऊन मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असे आम्हाला वाटते या आमच्या भावना आपल्या माध्यमातुन मुख्य निवडणुक आयोगाला कळविण्यात याव्यात अशी विनंती या निवेदना मार्फत करण्यात आली आहे.समितीचे अब्दुल लतिफ, गणेश रानबा वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बेलोचा,निरिक्षक तसेच नवीन मतदार यांंना ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला.निवेदन देताना मतदार जनजागरण समितीचे अब्दुल लतिफ, गणेश रानबा वाघमारे तर या कार्यक्रमात नायब तहसीलदार एन.पी.मुगावे, नायब तहसीलदार राजाभाऊ केरूळकर,एस.टी.बोतेकर एम.के.काझी,संतोष गायकवाड,ए.सी.सालगुंडे, सुधीर आचार्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top