कै .के टी पाटीलांसारखे मर्यादित क्षेत्रामध्ये समरसतेन अमर्याद काम केल्यासच न आपले आपल्या देशावरील देश प्रेम व्यक्त होईल –प्राचार्य एस एस देशमुख
उस्मानाबाद - आपल्या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी केशवराव तुकाराम पाटील सरांनी मर्यादित क्षेत्र निवडलं आणि ते म्हणजे शिक्षणक्षेत्र आणि उस्मानाबाद या ठिकाणी येऊन त्यानि शिक्षण या मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्याद काम करून दाखवलं याला म्हणतात राष्ट्रप्रेम आपण आपल्याला दिलेल्या कामांमध्ये किती समरसतेन आपल्या छोट्या क्षेत्रामध्ये म्हणजे छत्रपती भोसले हायस्कूल या क्षेत्रांमध्ये अमर्याद काम करण्याची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच आपल्या देशावरील आपले देश प्रेम आपण व्यक्त केलं असं होईल असे प्रतिपादन श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस देशुमुख यांनी आज प्रजासत्ताक दिना निमित्त बोलताना केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर उर्फ आण्णा केशवराव पाटील होते तर संस्थेच्या संचालिका सौ प्रेमाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल च्या प्रांगणामध्ये 73वा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत शिक्षक पाटील सर व सर्व विद्यार्थी चमूने श्रवणीय देशभक्तीपर सामूहिक गीते सादर केली. ""याप्रसंगी इयत्ता आठवी व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती धारक गुणानुक्रमे प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अकरावी बारावी विज्ञान शाखेतील नीट परीक्षेतील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या प्रसंगी प्राचार्य देशमुख म्हणाले कि स्वतंत्र भारतामध्ये शंभर टक्के मतदार मतदान करतात शंभर टक्के मतदार मतदान करतात का हासुद्धा मोठा प्रश्न आहे पण एकंदर बघितलं तर आजपर्यंत या संसदेचा इतिहास बघितला तर साधारणपणे 60 टक्के लोक मतदान करतात 40 टक्के मतदानाला येत नाही म्हणजे ते संविधानाणे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो आपण किती टक्के वापरतो हे तपासणे गरजेचे आहे कारणे अनेक असतील मी गावाला गेलो मी आजारी पडलो त्यामुळे जाऊ शकलो नाही काही जण तर टीव्ही बघत बसतात कुठे रांगेत उभे राहयचे म्हणून सुद्धा मतदानाला जात नाहीत म्हणजे सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचा असू देत ६० टक्के मतदान होतंय दोनच पक्ष म्हणजे 31 टक्के मतदान जाला मिळेल तो पक्ष या देशावर राज्य करेल 70 टक्के जनतेचा या देशाच्या राजकीय याच्यामध्ये सहभागी नाही असे म्हणावे लागेल आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की संविधानाने दिलेले हक्क संविधानाने दिलेले अधिकार आणि संविधान घेतलेल्या जबाबदाऱ्या आपण किती टक्के पार पाडू शकतोय याचा सुद्धा आपण आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे देशाबद्दल प्रेम आहे ते प्रेम या छोट्या छोट्या कृतीतून दिसत असतं आपल्या देशाला फक्त दीडशे वर्षे इंग्रजाबरोबर संघर्ष करावा लागला या जगामध्ये असे काही देश आहेत की त्यांना स्वातंत्र्यासाठी दोन हजार वर्षे घालवावी लागली आहे इज्राइल अतिशय छोटा देश आहे दिल्लीपेक्षा निम्मी लोकसंख्या म्हटलं तरी चालेल पण आज 1948 ला त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आज जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी इस्त्राईलच अस्तित्व एक वेगळा आहे ग्रामीण भागामध्ये जाऊन एखाद्या शेतकऱ्याला विचारा की तू तुझ्या फळबागांना कुठली खते घालतो तो सांगेल इस्त्राईल खते वापरतो आणि इस्त्राईल च्या कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापकांना विचार वर्षात किती दिवस काम करता तो सांगेल चार ते पाच महिने काम करतो बाकी दिवस काय करता बाकी दिवस मी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर असतो हे आहे देश प्रेम आहे आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये इस्त्राईल सर्वात पुढे आहे हे देश प्रेम देशातल्या प्रत्येक नागरिक सात ते आठ महिने व देशाच्या संरक्षणासाठी घालत असेल तर आपण सुद्धा आत्मचिंतन करणे गरजेचे आहे की आपण आपल्या देशासाठी किती वेळ देश संरक्षणासठी खर्च करतो आपल्याला माहित आहे आपल्या भारतामध्ये किती तरी तिबेटीयन शिक्षण घेतात पण त्याचे दुःख तुम्हा सर्वांना माहित आहे देशाची जमीन नाही असे तिबेटियन आज आपल्या देशामध्ये दलाई लामा आपल्याला माहित आहे तिबेट साठी संघर्ष करत आहे त्यांचा आयुष्य गेलं अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज बहात्तर वर्षे झालेत किती आनंदाची किती अभिमानाची गोष्ट आहे जे संघर्ष करतात ते संघर्ष करत आहेत पण ज्यांना स्वतंत्र मिळाले ते किती प्रामाणिकपणे त्याचा उपभोग घेत आहेत हा सुद्धा एक प्रश्नच आहे
देश प्रेम दाखवायचं म्हणजे काय करायचे आम्ही आमचे अधिकार वापरायचे म्हणजे काय करायचे असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडणं साहजिक आहे आम्ही देशप्रेम दाखवायचे म्हणजे अगदी राष्ट्रगीत स्वरांमध्ये म्हणणे म्हणजे देशप्रेम अगदी आपण देशाचा झेंडा आपल्या छाती वरती लावून द्या म्हणजे प्रेम देश प्रेमी अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून दिसत असतं आणि ते देश प्रेम म्हणजेच तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये किती प्रामाणिकपणे काम करतात ते म्हणजे देश प्रेम आपण सगळे काम करतो घालून दिलेल्या जे नियम आहेत ते नियम पाळण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतो पण आपलं सर्वस्व झोकून काम करणे म्हणजे देश प्रेम असतं गांधीजीनी एका पुस्तकांमध्ये म्हटले आहे अमर्यादित क्षेत्रामध्ये मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रांमध्ये अमर्याद काम करा आपल्या आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी केशवराव तुकाराम पाटील सरांनी मर्यादित क्षेत्र निवडलं आणि ते म्हणजे शिक्षणक्षेत्र आणि उस्मानाबाद या ठिकाणी येऊन त्यानि शिक्षण या मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्याद काम करून दाखवलं याला म्हणतात राष्ट्रप्रेम आपण आपल्याला दिलेल्या कामांमध्ये किती समरसतेन आपल्या छोट्या क्षेत्रामध्ये म्हणजे छत्रपती भोसले हायस्कूल या क्षेत्रांमध्ये अमर्याद काम करण्याची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच आपल्या देशावरील आपले देश प्रेम आपण व्यक्त केलं असं होईल अगदी सकाळ पासून ते झोपेपर्यंत सर्व कालावधीत आपण संस्थेसाठी शाळेसाठी किती वेळ देतो याचा विचार करा देशातल्या प्रत्येक घटकांनी एवढाच विचार केला तर देश विकसनशील राहणार नाही विकसित राहील आणि जग इजराइल चे उदाहरण देणार नाही तर भारताचे उदाहरण जगातले सर्व देश देतील आणि ती ऊर्जा आपल्या सर्व भारतीयांमध्ये आहे आपण सदर उर्जेचा वापर करून आपला देश विकसित करीत देश प्रेम वृद्धिंगत करुया अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद
यानंतर कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख ननावरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत असताना आपल्या भावना पुढील शब्दात व्यक्त केल्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्व देशभर अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असताना मोठ्या उत्साहात मध्ये सगळ्या देशांमध्ये हा राष्ट्रीय सण आपण साजरा करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या श्रीपतराव भोसले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि शेवटी त्यांनी सर्वांचे आभार मानले संस्थेचे अध्यक्ष सुधीर उर्फ अण्णा केशवराव पाटील सर संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय प्रेमाताई सुधीर पाटील संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य उर्फ भैया सुधीर पाटील प्राचार्य देशमुख सर सेवानिवृत्त शिक्षक पठाण सर के जाधव सर संस्थेचे नूतन संचालक कुलकर्णी उपमुख्याध्यापक श्री कोळी सर व उपप्राचार्य श्री घार्गे सर युवानेते अभिराम पाटील श्री हजारे सर श्रीमती गुंड मॅडम श्री के व्ही गायकवाड सर श्री वाघ सर परतापुर मॅडम ज्युनिअर कॉलेजच्या महिला आणि त्यांचे सर्व सहकारी ध्वनिक्षेपक यंत्रणा संचालक संजीव अभ्यंकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी संगीत विभागाचे पाटील सर त्यांचे सर्व संगीत विभागातील विद्यार्थी आपण या ठिकाणी गुणगौरव केला अशी सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक सर्व विभागाचे प्रमुख तथा पर्यवेक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी क्रीडा विभागाचे श्री बागल सर आणि त्यांचे सर्व सहकारी सांस्कृतिक विभागाचे टीपी शेटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे गणेश गोरे आणि त्यांचे सर्व सहकारी ध्वजारोहणासाठी तयारी करणारे सांडसे सर फोटोग्राफी करणारे भोसले सर श्री शेंडगे सर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करणारे पाटील सर जगताप सर जोगदंड सर पर्यवेक्षक देशमुख सर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी इत्यादींचे आभार मानले आणि वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली
याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.सुधीर( अण्णा )पाटील, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील , संस्थेचे संचालक श्री. संतोष कुलकर्णी ,के. के. जाधव ,प्रशासकीय अधिकारी मा. आदित्य पाटील ,युवा नेते अभिराम पाटील, राष्ट्रपती पारितोषिक विजेते निवृत्त शिक्षक श्री पठाण वाय. के. ,उपप्राचार्य संतोष घारगे ,उपमुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर कोळी सर्व पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षिका वृंद उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख टी .पी. शेटे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री एस. सी. पाटील सर व संदीप जगताप सर यांनी केले .