आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून कुक्कडगांव येथे जलशुध्दीकरण प्रकल्पाचे भुमीपुजन

0
उस्मानाबाद/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून (०५.०० लक्ष) मौजे कुक्कडगांव ता. परंडा येथे  प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११:३० वा आर.ओ.प्लँट (जलशुध्दीकरण प्रकल्प) चे भुमीपुजन आ. सुजितसिंह ठाकूरसाहेबांचे सुपुत्र युवानेते मा. समरजितसिंह (भैय्या) ठाकूर यांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ॲड.जहीर चौधरी, उद्योग आघाडीचे हणुमंत पाटील, विठ्ठल तिपाले, निशिकांत क्षीरसागर, आनाळा सरपंच जोतीराम क्षीरसागर, भोंजा सरपंच शरद कोळी, ॲड. तानाजी वाघमारे, कुक्कडगांव सरपंच आमीर शेख, हिगंणगाव सरपंच औसरे, ॲड. कोकाटे, साहेबराव पाडूळे, पोपट सुरवसे, रामा खरात, भाऊसाहेब पाटील आनाळकर, चांगदेव चव्हाण, अरूण चोपडे सर तसेच गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top