उस्मानाबाद (प्रतिनिधी) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अन्वये राज्य शासनाने केलेल्या सुधारणेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व रसातळाला गेल्याने भाजपाच्या बुडाखाली आग लागली आहे. आणि त्यामुळेच या विधेयकाच्या विरोधात भाजपाने दिशाभूल आंदोलन सुरू केले आहे. अशी माहिती युवा सेनेच्या वतीने उस्मानाबादेत प्रसार माध्यमांशी संवाद साधून देण्यात आली.
विद्यापीठ अधिनियमामध्ये झालेल्या सुधारणेचा आनंदोत्सव सोमवारपासून (दि. २४ जानेवारी) जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये साखर आणि पेढे वाटून साजरा केला जाणार आहे. अशी माहिती युवा सेनेचे राज्य विस्तारक अविनाश खापे - पाटील यांनी दिली आहे. युवा सेनेचे जिल्हा समन्वयक तथा सरपंच ॲड. संजय भोरे, कोथळा येथील सरपंच दीपक जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील विवेकवादी सुधारणा नेमक्या काय आहेत याची माहिती युवा सेनेच्या वतीने देण्यात आली.
कुलगुरू नंतर
प्र कुलपती पद निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्रपती समवेत वेगाने संवाद होणार आहे. भाजपशासित गुजरात राज्यामध्ये विद्यापीठ कुलगुरू ची नियुक्ती सरकार करते मग महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने या सुधारणांमध्ये बदल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व खालसा केले आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजवर विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक काळेबेरे उद्योगधंदे केलेले आहेत. कुलगुरू आणि इतर पदांच्या नियुक्तीसाठी अत्यावश्यक असणारे निकष पात्रं असणाऱ्या मंडळींना देखील भाजपाने विद्यापीठात स्थान देण्याचे काम केलेला आहे. हे भविष्यात उजेडात येणार आहेत. याकरिता भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने आंदोलन करून दिशाभूल करण्याचा प्रकार केलेला आहे.
युवा सेनेचे जिल्हा समन्वयक तथा सरपंच ॲड. संजय भोरे यांनी माध्यमप्रतिनिधीशी बोलताना सांगितलं,प्र कुलपती पद कुलपती नियुक्ती पद्धती आणि नियुक्त्या मधील सुधारणा बरोबरच अधीसभा सदस्यांची वाढ, व्यवस्थापन परिषद सदस्य संख्या वाढ मराठी भाषा आणि साहित्य जतन प्रचालन मंडळ आणि समान संधी मंडळ यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना विद्यापीठाच्या माध्यमातून आसरा देण्याचे काम आजवर भाजपा सरकारने केलेल्या आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केलं.
युवा सेनेचे राज्य विस्तारक अविनाश खापे - पाटील म्हणाले, कुपतींचे कोणतेही अधिकार न काढता कायदेशीर मार्गाने प्र-कुलपती यांना अधिकार देण्याची व्यवस्था या नवीन सुधारणांमध्ये केलेली आहे. गुजरात सरकारने त्यांच्या राज्यात सत्तेचा वापर करून विद्यापीठांमध्ये सोयीप्रमाणे नेमणूक केली मग महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी ने केलेला बदल भारतीय जनता पार्टीच्या भानगडींची पोल-खोल करणारा ठरेल आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपाने बोंबाबोंब सुरू केल्याचं सांगितलं.
भाजपाने सत्तेच्या काळात राज्यातील आठ विद्यापीठांमध्ये वर्णी लावलेल्या निकष पात्र नसणाऱ्या व्यक्तींची नाव आणि तपशील पुरावा दाखल माध्यमांच्या हवाली केलेला आहे.
विद्यापीठ अधिनियम सुधारणेचा आनंदोत्सव म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन युवक संघटना आणि युवकांशी संवाद साधून साखर आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचं सांगितलं
विद्यापीठ अधिनियम सुधारणेचा आनंदोत्सव म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन युवक संघटना आणि युवकांशी संवाद साधून साखर आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचं सांगितलं