तुळजापुर शहरात नविनच प्रकार उघडकीस आलाय पोलीस सुध्दा सुरुवातीला चक्रावले होते परंतु संशय वाढल्याने पोलीसानी सत्य बाहेर काढलेच आणि पुन्हा तुळजापुर पोलीसानी दमदार कारवाई केली.
तुळजापुर शहरा जवळील पाचुंदा तलावात सोमवारी पहाटे दारु वाहतुक करणारा ट्रक तलावात पडलाय असा फोन आला तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ सई भोरे पाटील पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद यांनी ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरकडे चौकशी केली असता झोपेत ट्रक तलावात पडल्याचे सांगितले परंतु संशय वाढल्याने पोलीसानी चौकशी केली असता सत्य बाहेर आले.
पायोनर डिस्लरी बाळापुर नांदेड येथुन मँकडोल नंबर वन व्हिस्कीचे अकराशे बाँक्स घेवुन संभर्गी ट्रेडर्स कोल्हापुर येथे अंदाजे ७४ लाख रुपयाची दारु घेवुन निघाला होता. लातुर येथे ४१५ बाँक्स दारु परस्पर विकली व हट्टा जिल्हा हिंगोली? येथे ३१ बाँक्स दारु परस्पर विकली होती. सदरील चोरी उघडकीस येवु नये म्हणुन TS 18 T 5623 हा ट्रक ड्रायव्हरने तुळजापुर येथील पाचुंदा तलावात गाडी घातली अपघात झाला आणि दारुचे बाँक्स पाण्यात फुटले असे भासवुन चोरी लपवायची होती परंतु पोलीसांना संशय आल्याने चोरी उघडकीस आली विकलेले सर्व बाँक्स जप्त केले असुन राँयल ट्रान्सपोर्ट नांदेड ट्रक मालक जुनेद शेख ट्रक ड्रायव्हर रमेश खरकाडे क्लिनर अनिल हिमगिरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रर्किया तुळजापुर पोलीस स्टेशनला उशिरा पर्यंत चालु होती.