उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा : जिल्ह्यातील वाहन चोरीचा छडा लावण्याकामी स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- अरब, पोना- अमोल चव्हाण, बबन जाधवर, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड यांचे पथक कार्य करत होते.
पथकाने दि. 18.01.2022 रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दिलावरनगर, बीड येथील शेख अब्दुल रहीम अब्दुल करीम यास एक पिकअप व एक क्रुझर वाहनासह ताब्यात घेतले. नमूद दोन्ही वाहनांच्या मालकी- ताबा या विषयी तो पथकास समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पथकाने त्या दोन्ही वाहनांच्या सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे तांत्रीक तपास केला असता ती दोन्ही वाहने कळंब पो.ठा. हद्दीतून चोरीस गेली असल्याने कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंद क्र. 412 / 2021 व 24 / 2022 हे दोन गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे