लोहारा नगरपंचायत विजयाबद्दल उमरग्यात शिवसैनिकांकडून जल्लोष

0

 उस्मानाबाद : ( Lohara Nagar Panchayat in Osmanabad District )
लोहारा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शिव-राष्ट्र शहरविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने उमरगा तालुका शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 युवा नेते किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, विधानसभा संघटक शरद पवार, योगेश तपसाळे, रमेश जाधव, युवा सेना शहरप्रमुख अमर शिंदे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, दत्तात्रय शिंदे, अप्पासाहेब पाटील, खयूम चाकूरे, साई विभूते, विक्रम शहापुरे, ज्ञानेश्वर सांगवे, मुजीब इनामदार, रोहित पवार, निखिल वाघ, विलास पतगे,  ओम जगताप, विक्रम दासमे, आकाश मोरे,  विजय कदम, पंकज जगताप, मूर्तजा मुंगळे, समीर लोणी, सचिन तेलंग, नागेश व्हनाळे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top