डॉक्टर हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब,गरजूना ब्लँकेट व फळे वाटप

0


लोहारा/प्रतिनिधी
 लोहारा शहरातील मसणजोगी वस्तीत राहत असलेल्या गरीब,गरजू चे थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी डॉ.हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत २७ ब्लँकेट व फळे वाटप करण्यात आले. सध्या थंडीचे दिवस असून, सर्वसामान्य व्यक्ती आपली थंडी उबदार कपडे घालून कमी करू शकतो. मात्र, जे वंचित आहेत, गोरगरीब आहेत त्यांना पोटाची खळगी भरतानाच अडचण येते, तर त्यांनी गरम कपडे कधी खरेदी करायचे? अशा वंचितांना आधार देण्यासाठी, त्यांची थंडी काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत.

सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी होईल तेव्हडी मदतीचा हात पुढे करून समाजात निर्माण झालेली दरी काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकेल.असे मत डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी व्यक्त केले. लोहारा येथील डॉ.हेमंत श्रीगिरे यांनी वाढदिवसानिमित्त कुटुंबाना ब्लँकेट व फळे वाटप केली. यावेळी नागण्णा वकील, पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभापती दयानंद गिरी, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक जालिंदर कोकणे,  हरी लोखंडे, कमलाकर सिरसाट, हाजी बाबा शेख, सुधीर घोडके, स्टेट बँक इंडिया लोहारा शाखा प्रबंधक प्रसाद कांबळे, विश्वजीत नरवडे, राजु स्वामी, उत्तम पाटील, बसय्या स्वामी सर, किशोर जावळे, खंडू सरवदे, अनिल येलुरे, स्वप्नील पटवारी, आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्तविक दयानंद गिरी यांनी केले तर आभार बसय्या स्वामी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top