पवार साहेब लवकर बरे व्हावे यासाठी धारासुर मर्दिनी देवी ला खणा नारळा ने ओटी भरून अभिषेक व महाआरती पूजा

0

उस्मानाबाद :-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, मा.ना. शरदचंद्रजी पवार साहेब दोन दिवसा पुर्वी कोरोना पॉजीटीव्ह आले आहेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि साहेबांनी ज्याप्रमाणे कॅन्सर सारख्या आजारावर मात करून पुन्हा एकदा समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय झाले त्याच प्रमाणे या कोरोनाच्या संकटावर पण मात करून साहेब पुन्हा एकदा जन सेवेसाठी रुजू व्हावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चे युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य भैय्या गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा सचिव अजयकुमार कोळी यांच्या तर्फे धारासुर मर्दिनी देवी ला खणा नारळा ने ओटी भरून अभिषेक व महाआरती पूजा तसेच होम हवन करून पवार साहेबांच्या दीर्घाविष्यासाठी व लवकर बरे होण्यासाठी साकडं घालण्यात आले आहे.

या वेळी युवक जिल्हा सहसचिव अजयकुमार कोळी, युवा नेतृत्व शेखर घोडके, युवा नेते मृत्युंजय बनसोडे, युवा नेते रणवीर इंगळे,  युवक शहर उपाध्यक्ष कुणाल करवर, सूरज वडवले, विजय सोलनकर, शुभम काशीद, सागर पवार, ई पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top