ढोकी पोलीस ठाणे : उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामस्थ- किरण हरिश्चंद्र थोडसरे यांना एका अनोळखी फोन क्रमांकावरुन दि. 24.01.2022 रोजी 15.20 वा. सु. कॉल आला. त्या समोरील महिलेने, “तुमच्या क्रेडीट कार्डची कर्ज मर्यादा ( Credit card debt limit ) वाढवण्यासाठी तुमच्या कार्डवरील 16 अंकी क्रमांक सांगा.” असे किरण थोडसरे यांना सांगीतले. यावर थोडसरे यांनी काही एक विचार न करता आपल्या 2 क्रेडीट कार्डवरील माहिती त्या समोरील महिलेस दिली. तसेच यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेले ओटीपीचे 3 लघु संदेशही त्या समोरील महिलेस सांगीतल्याने थोडसरे यांच्या बँक खात्यातून तीन व्यवहारांत एकुण 1,01,100 ₹ रक्कम कपात झाली. अशा मजकुराच्या किरण थोडसरे यांनी दि. 26 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
क्रेडीट कार्डची कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी माहिती घेऊन एक लाख रुपयांची फसवणूक - Credit card debt limit
जानेवारी २७, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा