उस्मानाबाद जिल्ह्याला प्राचीन असा वारसा लाभला आहे. उस्मानाबाद पासून पश्चिमेला 5 किमी अंतरावर बालाघाट डोंगर रांगेत इ. स. सहावे ते आठव्या शतकातील उत्तर वाकाटक काळातील लेणी आहेत.
हा सात लेणींचा लेणी समूह असून येथील लेणी क्रमांक दोन ( पार्श्वनाथ भगवान ) मुख्य अशा लेणी जवळ पाण्याचे कुंड असून येथे इतिहास व पुरातत्व अभ्यासक श्री.जयराज खोचरे यांना संशोधन करत असता त्यांना प्राचीन काळातील दोन जाते सापडले.
त्यांच्या म्हणण्यानुसार लेणीमध्ये वास्तव्य करणारे साधक अथवा भिकू हे भिक्षा मागून उदर निर्वाह करत असून काही अनुयायांनी व धर्म दीक्षा देणाऱ्या लोकांनी दिलेली मदत व धान्य हे दळण्यासाठी ह्या जात्यांचा उपयोग होत असावा.
पाण्याच्या कुंडाजवल हे जाते भेटल्याने या ठिकाणी अन्न बनवण्याची जागा व जात्याचे लहान मोठे आकार यावर आपण असे सांगू शकतो की, व्यक्तिगत अन्न बनविले जात असावे तर काही वेळा सामूहिक अन्न दळले जात असावे.
याच भागात एखादी प्राचीन वसाहती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुरातत्व खाते यांनी या ठिकाणी उत्खनन करावे अशी मागणी श्री जयराज खोचरे यांनी यावेळी बोलताना केली.