लातूर- येथील प्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार यांचा नुकताच विविध ठिकाणी तीन पुरस्कार देऊन सन्मान झाला आहे. हिंगोली येथील डॉ. श्रीराम कर्हाळे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या संत नामदेव साहित्य पुरस्कार भारत सातपुते यांनी संपादित केलेल्या लातूरचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या आठवणींचे 'मांजराकाठ' या ग्रंथास हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला.
तर'आता बोंबला 'या वात्रटिकासंग्रहास मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने प्रा.शशीकांत जाधव यांच्या कल्पकतेतून माजी मंत्री मा. लक्ष्मणराव ढोबळे, आ.समाधान औताडे , संपादक दिगंबर भगरे यांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला .
भारत सातपुते यांनी साहित्याच्या लेखन क्षेत्रात पुस्तकांचे ओलांडलेले अर्धेशतक , साक्षरता व सर्व शिक्षा अभियानांतर्गत समन्वयकाची बजावलेली भुमिका,नोकरीच्या काळात राबवलेले धाडसी कॉपीमुक्ती अभियान , भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा, वृक्षारोपन व भादा येथील दोन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी कार्यरत असताना मुख्यालयी राहुन सतत साडेचार वर्ष राबवलेला सुट्टीविना शाळा हा अनोखा उपक्रम आदी कार्याची नोंद घेवून संयोजक संजय राजोळे,गंगाधर डिगोळे यांच्या निवडीने लातूरच्या सप्तफेरे मंडळाच्यावतीने शिक्षकप्रिय आमदार मा. विक्रम काळे, औशाचे आमदार मा. अभिमन्यू पवार , डॉ.विठ्ठल लहाने, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मा.नरसिंह घोणे आदींच्या उपस्थितीत भारत सातपुते यांना साहित्यसेवा पुरस्कार देऊन नुकताच डीपीडीसी सभागृहात गौरव करण्यात आला.