google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात राज्यावर आणखी एक संकट!

महाराष्ट्रात राज्यावर आणखी एक संकट!

0

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान असतानाच आता राज्यावर आणखी एक संकट घोंगावत आहे आणि ते म्हणजे अवकाळी पावसाचं . राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे . तर कुठे गारपीट होत आहे . त्यातच आता आणखी तीन दिवस राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर काही भागांत गारा पडण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली असून आंबा आणि काजूच्या बागांना मोहोर येत असताना झालेला हा बदल बागायतींसाठी अनुकूल नसल्याचेही म्हटले जात आहे . 

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 

9 जानेवारी 

कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . मध्य महाराष्ट्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे . मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे .. 

विदर्भ- काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता .

10 जानेवारी 

कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे . मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे . तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता . 

विदर्भ- काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . तुरळक ठिकाणी ोगगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची शक्यता . 

11 जानेवारी कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता . मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . 

मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . विदर्भ बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व गारा पडण्याची शक्यता . 
12 जानेवारी 
कोकण - हवामान कोरडे राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता मराठवाडा हवामान कोरडे राहण्याची शक्यता . 

विदर्भ- काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता . तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top