google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 माळुंब्रा जिल्हा परिषद प्रशालयात बालविवाह प्रतिबंधक प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्न

माळुंब्रा जिल्हा परिषद प्रशालयात बालविवाह प्रतिबंधक प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्न

0

तामलवाडी:- दि.  7 जानेवारी येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला माळुंब्रा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या शाळेत  भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त सुरतगाव केंद्रातील दिनांक सहा व सात जानेवारी रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या साठी बाल विवाह प्रतिबंधक संवाद कार्यशाळा  संपन्न होत आहे.    


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशाला माळुंब्रा च्या मुख्याध्यापिका श्रीमती विभावरी गायकवाड तर प्रमुख पाहुणे सुरत गावचे केंद्रप्रमुख राजेश धोंगडे केंद्रीय मुख्याध्यापक प्रमोद कानडे प्रशिक्षक शांताराम कुंभार ,गुणवंत चव्हाण, तुकाराम शिरसागर हे होते. तर सामाजिक अंतर ठेवून   यांनी ग्रामीण व शहरी भागातील मुलींच्या बाल विवाह विषयक विविध समस्या व अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालविवाह प्रतिबंध या कार्यक्रमाविषयी   सविस्तर माहिती दिली व चित्रफिती व लघुपट दाखवले .   

 

 यावेळी  शिक्षक औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव  सावळे, प्रभाकर जाधव ,   महादेव माळी , लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार ,  ,योगेश राऊत,  ,बालाजी रणसुरे, मनोज पाटील ,रघुनाथ भिसे,कविटकर  ,महादेव वाघमारे, तुकाराम वाडकर ,राजाराम वाघमारे, उत्तरेश्वर पैकेकरी ,आंधळकर ,शिनगारे ,कदम, देविदास गायकवाड, भानुदास कांबळे महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे , छाया सूर्यवंशी, कापसे ,राऊत ,व्होटकर, पाटोळे, कांबळे ,जाधवर ,हब्बू, कोरबू इत्यादी 55  शिक्षक उपस्थित होते  अनिल हंगरगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार सरस्वती विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रभाकर जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top