Osmanabad :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे काल अल्पशा आजाराने पुणे येथे दुखद निधन झाले.
त्यानिमीत्त भाजप जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहन्यात आली.
2021 मध्ये सिंधुताई सपकाळ यांंचा भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव केला होता. अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या सिंधुताईंचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ याचं वक्तृत्वावरही चांगलं प्रभुत्व होतं.
कार्यक्रमांमध्ये त्यांना ऐकण्यासाठी अनेकदा मोठी गर्दी जमायची. त्यांना माई म्हणून ओळखलं जात होतं. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच अस्खलित ऊर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून त्या मनं जिंकून घेत.
याप्रसंगी भाजप कार्यालयात सुनिल काकडे, अर्चना अंबुरे, डॉ प्रशांत पवार, अभय इंगळे, विजय शिंगाडे, प्रविण सिरसाठे, राहुल काकडे, नामदेव नायकल, ॲड.जोती वाघे, सुवर्णा पाटील, ओम नाईकवाडी, अँड कुलदीप भोसले, सतिश वेदय, वैभव हंचाटे, हिम्मत भोसले, प्रसाद मुंडे, सागर दंडनाईक व भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.