नागरी भागाव्यतिरिक्त इतर भागातही बीपीएमएस पद्धतीचा वापर करणार : कौस्तुभ दिवेगावकर ( Kaustubh Divegavkar )
उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- जिल्ह्यातील नागरी भागाव्यतिरिक्त इतर ग्रामीण भागातही ऑनलाईन Building permission management system ( BPMS ) पद्धत कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ( Collector Kaustubh Divegavkar ) यांनी आज 5 जानेवारी 202 रोजी दिली.
बीपीएमएस पध्दतीबाबाबत महसूल विभाग आणि नगर रचना विभाग यांच्यामार्फत प्रशिक्षण कार्यशाळा आज घेण्यात आली, तेव्हा श्री.दिवेगावकर बोलत होते. ग्रामीण भागात बांधकाम विकास परवानगी घेण्याकरिता सोपी कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरात लवकर ऑनलाईन व्यवस्था सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असेही श्री .दिवेगावकर ( Collector Kaustubh Divegavkar ) यांनी सांगितले आहे.