खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा AIMIM वतीने निषेध - Osmanabad
उस्मानाबाद :- AIMIM पार्टीचे , बॅरिस्टर खासदार असदोद्दीन ओविसी यांच्यावर 03/02/2022 रोजी झालेल्या जिवघेणी हल्लाचा उस्मानाबाद AIMIM पार्टीच्या वतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात खासदार ओविसी यांना Z + Security देऊन दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
निवेदनात म्हटले आहे दि . 03/02/2022 रोजी AIMIM पार्टीचे सर्वेसर्वा तथा बॅरिस्टर खा . असोदोद्दीन ओविसी साहेब यांच्यावर छिजारसी टोल गेटवर काही समाजकंठक लोकांनी त्यांच्यावर जिवघेणी हल्ला केला , परंतु सुदैवाने ते त्यांच्यातुन वाचले व त्यांच्या वाहनावर चार राऊंड फायर झाले व ते त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न केला . यापूर्वीही दिल्ली येथे त्यांच्या राहत्याघरावर विघातक हल्ला करण्यात आला होता असे वारंवारच्या हल्ल्यामुळे देशातील CBI व Intelligence अकार्यक्षम झाल्याचे संदेश सर्वदुर समाजात पसरत आहे तसेच ज्या व्यक्तीला उत्तम संसदपटु म्हणुन पुरस्कारीत केले व एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या सोबत अशा निदनीय घटना घड़ने ही बाब अत्यंत संशयकारक आहे . या सदरील घटनेचा आम्ही AIMIM पक्षातर्फे तिव्र निषेध नोंदवत असून आमची मागणी आहे की , खा . असोदोद्दीन आवेसी साहेब यांना Z + Security गृहमंत्रालयाकडून त्वरीत देण्यात यावी तसेच या हल्यामागील दोषींना त्वरीत अटक करण्यात येऊन त्यांना कठोर शासन करण्यात यावे तसेच आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पडाव्यात , कायदा व सुव्यस्था कायम रहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे , कायदा व सुव्यवस्था कायम करण्यात यावी म्हणुन आज रोजी लोकशाही मार्गाने लढा देऊन आम्ही जिल्हाधिकारी मार्फत निवेदन आपल्या सेवेत पाठवित आहोत व जाहिर निषेध व्यक्त करीत आहोत कृपया याची नोंद घ्यावी असे केंद्रीय गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


