चालक पोलीस शिपाई भरती २०१९ मधील उमेदवारांस सुचना - Osmanabad Driver Police Peon Recruitment Notice
उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस शिपाई- 2019 परिक्षेचा अंतीम निकाल आज दि. 04.02.2022 रोजी जाहिर झाला असून तात्पुरती निवड यादी उस्मानाबाद पोलीस दलाच्या https://osmanabadpolice.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून ही निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे. “मी वाहन चालक पोलीस शिपाई- 2019 या परिक्षेकरीता महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका पेक्षा अधिक घटकांत अर्ज भरलेला नसून फक्त उस्मानाबाद पोलीस घटकात अर्ज भरलेला आहे.” अशा स्वरुपाचे बंधपत्र सादर करण्याकरीता नमूद यादीतील उमेदवारांनी दि. 08.02.2022 रोजी 10.00 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद येथे हजर रहावे. तसेच तात्पुरत्या निवड यादीबाबत उमेदवारांस आक्षेप असल्यास त्यांनी लेखी आक्षेप दि. 07.02.2022 रोजी 16.00 वा. पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावेत. त्यानंतर आलेल्या आक्षेप विचारात घेतले जाणार नसून अंतीम निवड यादी त्यानंतर प्रसिध्द केली जाणार आहे. असे आवाहन पोलीस अधीक्षक मा. श्रीमती नीवा जैन यांनी उमेदवारांस केले आहे.


