उस्मानाबाद,दि.22(जिमाका):- हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एफसीआय मार्फत उस्मानाबाद जिल्हयात दि. 16 फेब्रुवारी-2022 पासून NEML पोर्टलवर हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्हयात एफसीआयकडून 15 हरभरा खरेदी केंद्र मंजूर केली आहेत.
खरेदी केलेल्या शेतक-यांच्या FAQ हरभराला प्रती क्विंटल 5 हजार 230 रूपये दर देण्यात येणार आहे. हरभरा उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी . 7/12 उतारा आणि त्यावर हरभरा पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स ( बॅक अकॉऊट नंबर व IFSC CODE स्पष्ट असावा) या कागदपत्राची आवश्यकता आहे.
पुढीलप्रमाणे सबएजंट संस्थेकडे नोंदणी करावी .
संस्थेचे नाव, तालुका, खरेदी केंद्र, संस्थेचे नावे असे- उस्मानाबाद- कनगरा टाकळी (बें),उस्मानाबाद तालुका खरेदी विक्री सह संस्था उस्मानाबाद,वसुंधरा ॲग्री फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कनगरा, विकास कृषी प्रक्रिया व पणन सह संस्था उस्मानाबाद.उमरगा-उमरगा गुंजोटी, श्री स्वामी समर्थ सर्व सेवा सह सं म गुंजोटी, विविध कार्य सेवा सह संस्था लि गुंजोटी. लोहारा- कानेगांव दस्तापुर जगदंब खरेदी विक्री सह संस्था लोहारा.दस्तापुर विविध कार्य सेवा सह संस्था दस्तापुर. तुळजापुर- तुळजापुर नळदुर्ग, ता. शेतकरी सह ख वि संघ लि तुळजापुर.श्री. खंडोबा पणन सहकारी संस्था अणदुर. कळंब-कळंब चोराखळी, एकता खरेदी विक्री सह संस्था उस्मानाबाद.राजमाता कषी पुरक सेवा पुरवठा सह सं चोराखळी.भूम- भूम ईट श्री. शिवाजी भुम ता. शे. सह ख. वि.भुम.तनुजा महिला शेतीपुरक से पु स सं सोत्रेवाडी.वाशी-वाशी तालुका शेतकरी सह संस्था लि वाशी.परंडा-परंडा श्री. साई कृपा कृषी पुरक सह संस्था परंडा असे आहेत.
खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी.त्यानंतर हरभरा खरेदीस शेतकऱ्यांस SMS आल्यानंतरच हरभरा स्वच्छ करुन वाळवून FAQ दर्जाचा हरभरा खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणवे आणि या योजनेचा जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.एम.सोमारे यांनी केले आहे.
****