विकासासाठी जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे मुख्यमंत्री कडे फुक संघटनेची मागणी

0

उस्मानाबाद  :- उस्मानाबाद व यवतमाळ हे महाराष्ट्रात सर्वात मागासलेले जिल्हे आहेत. हे जिल्हे दुष्काळग्रस्त तर आहेतच,तसेच संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्त्या या दोन जिल्ह्यातच होत आहेत. यवतमाळ जिल्ह्याला आपल्या मंत्री मंडळात स्थान असल्याने थोडी परिस्थिती बरी आहे.औद्योगिक विकासाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात उस्मानाबाद जिल्हा फारच मागासलेला आहे. साखर कारखाने बहुतेक आजारी व बंद पडलेले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. 

ग्रामीण भागातील बहुतेक तरुण, रोजगारासाठी पुणे मुंबईस गेल्याने, खेडी ओस पडली आहेत. उस्मानाबाद जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीनेही महाराष्ट्रात सर्वात माघे आहे. कारण हा जिल्हा बालाघाटच्या डोंगर रांगावर बसलेला असल्याने धरणे बांधण्यासाठी येथे योग्य साईट्स नाहित. ब-याच नद्यांचा उगम येथूनच होतो, त्यामुळे या जिल्ह्यात त्यांचे पात्र लहान आहेत.सिंचन व्यवस्था नसल्याने येथील शेती फारशी पिकत नाही, त्यामुळे शेतकरी मारला जात आहे. कारखाने व उद्योग धंदे नसल्याने तरुणांच्या हाताला काम नाही.

 तरुण वर्ग भरकटलेल्या अवस्थेत जगत आहे.रोजगारासाठी  मोठ्या शहाराकडे स्थलांतरीत होत  आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या जिल्ह्याला सक्षम नेतृत्वाची व मंत्री पदाची गरज आहे. विशेष म्हणजे आमच्या शेजारील जिल्ह्यांना दोन-दोन तिन-तिन मंत्रीपदे दिलेली असताना, आमच्या जिल्ह्याला एकही मंत्रीपद नाही हा आमच्यावर अन्यायच आहे असे आम्ही समजतो,आपल्या मंत्री मंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला स्थान मिळालेले नसल्याने या जिल्ह्याचे मागासलेपण आणखी वाढत आहे.
 कारण शासनाच्या योजना व पैसा जिल्ह्यात ओढून आणण्यासाठी, जिल्ह्याला मंत्री हा लागतोच लागतो.सध्या मंत्री मंडळातील मंत्री आपापल्या जिल्ह्याला योजना ओढून नेत आहेत.उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्री पद नसल्याने,उस्मानाबादकडे  कोणाचेही लक्ष नाही. उस्मानाबासाठी मंजुर असलेल्या 21 टी  एम सी पाणी योजनेचे काम मंदावले आहे. जिल्ह्यासाठी  मंजुर असलेले काही सिंचन व इतर प्रकल्प निधी अभावी रखडलेले आहेत.बरेच प्रस्तावित विकास प्रकल्प मंजुरी अभावी प्रलंबित आहेत. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी  ज्या गतीने निधी मिळत आहे, ते पहाता हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी किमान 25 वर्षाचा काल जाईल.ही सर्व कामे वेळेत व ताकतीने करुन घेण्यासाठी जिल्ह्याला मंत्री पदाची आवश्यकता आहे.उस्मानाबाद जिल्ह्यावर होत असलेला हा अन्याय थांबविण्यासाठी व या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी,आपल्या मंत्रीमंडळामधे आमच्या जिल्ह्याला सामावुन घ्यावे, अशी विनंती  "फूक" संघटनेकडून उस्मानाबाद जिल्हावाशियांच्या वतीने, आम्ही आपणास करत आहोत.अशा प्रकारचे लेखी निवेदन फोरम ऑफ सिटिझन उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले.यावेळी एम. डी.देशमुख,धर्मवीर कदम,अब्दुल लतिफ,मुकेश नायगावकर,गणेश रानबा वाघमारे,रंगनाथ भोसले, रमेश बाराते,सहदेव नागमोडे, लक्ष्मणराव धाकतोडे,शेषराव दुधनाळे,पी आर गपाट,नितिन राऊत,प्रमोद चव्हाण अन्य इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top