माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांना पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी कार्यालयात अभिवादन
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,उस्मानाबाद जिल्हा कार्यालयामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. आबा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले..
महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. आबा पाटील यांची आज पुण्यतिथी. कोणतीही राजकीय पाश्वभुमी नसतांनाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आर. आर. आबांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. जिल्हा परिषद सदस्य,सहा वेळा आमदार,ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी अनेक सत्तापदे उपभोगूनही सत्तेचा अहंकार कधी आर. आर. आबांच्या आसपास फिरकला नाही. "साधी राहणी, उच्च विचारसरणी"या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेले आर. आर. आबा अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या प्रेमळ स्वभावाने, मृदू वाणीने लोकांची मनं जिंकतच राहिले. जनतेच्या मनात कायमचं घर करून गेलेले जनतेचे लाडके नेते दिवंगत आर. आर. पाटील यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान,महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे निर्माते,डान्स बार बंदी असे राज्याला व देशाला दिशा देणारे महत्वपूर्ण निर्णय घेणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते स्व.आर.आर.पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.स्व.आर.आर.पाटील यांचे कार्य अविस्मरणीय आहे.सामान्य लोकांच्या मनात घर केलेले नेते म्हणून त्यांची ओळख कायम राहील.असे दुधगावकर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक बाबा मुजावर, युवा नेते रणवीर इंगळे, रंजीत वरपे तालुका अध्यक्ष वक्ता सेल कळंब, इक्बाल पटेल, अनिल जाधव, ऋषिकेश चव्हाण तालुका उपाध्यक्ष ओबीसी सेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते..