google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्नीच्या खूनाच्या आरोपात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा”

पत्नीच्या खूनाच्या आरोपात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा”

0

बेंबळी पोलीस ठाणे : उस्मानाबाद तालुक्यातील सांगवी (बेंबळी) येथील महादेव पांडुरंग सुरवसे याने पत्नीच्या चारीत्र्याच्यावर संशय घेउन दि. 07.04.2019 रोजी रात्री पत्नी घरात झोपलेली असतांना तीच्या डोक्यात दगड घालून व गळा दाबून तीचा खून केला होता. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत हा खूनाचा गुन्हा नोंदवण्यात येउन या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपासिक अधिकारी पोउनि- श्री. उत्तम जाधव यांनी करुन तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोपपत्र उस्मानाबाद सत्र न्यायालयात दाखल केले होते.

            यात साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे तसेच उस्मानाबाद पोलीस दलातील श्वान- ल्पुटो व त्याचे हस्तक पोहेकॉ- स्वप्नील ढोणे यांच्या कामगीरीमुळे व शासकीय अभियोक्ता- श्री. जयंत देशमुख यांच्या युक्तीवादातून या खटल्याची अति. सत्र न्यायालय क्र. 1, उस्मानाबाद येथे सुनावणी होउन आज दि. 02.02.2022 रोजी सत्र न्यायाधीश श्री. एम.आर. नेरलेकर यांनी आरोपी- महादेव सुरवसे यास खूनाच्या गुन्ह्यात भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 ₹ दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top