google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ - Scholarships on MahadibT Portal

महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ - Scholarships on MahadibT Portal

0

महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ - Scholarships on MahadibT Portal


उस्मानाबाद,दि.2(जिमाका): जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित विनाअनुदानित,कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी,  2020-21 साठी पुन्हाअर्ज (Re-apply) करण्यासाठी  तसेच  2021-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI),  शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि.14 डिसेंबर,2021 पासून सुरु करण्यात आले आहे.हे अर्ज आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन दाखल करता येणार आहेत,तेव्हा संबंधित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी.जी.अरावत यांनी केले आहे.

जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यकर्मचारी आणि विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजुरीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास 15 फेब्रुवारी, 2022 पर्यत ऑनलाईन सादर करावेत.ज्या विद्यार्थांनी महाडिबीटी वर यापूर्वी आधार संलग्नीत युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत, त्यानी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास आणि एका पेक्षा जास्‍त युजर आयडी तयार केल्यास आणि त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयांची राहील, असेही श्री.अरावत यांनी स्पष्ट केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top