google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 किलजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ;गावावर सीसीटीव्हीची नजर असताना देखील चोरट्यानी २ दुकान,१ हॉटेलवर मारला डल्ला

किलजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ;गावावर सीसीटीव्हीची नजर असताना देखील चोरट्यानी २ दुकान,१ हॉटेलवर मारला डल्ला

0




चोरट्याना सीसीटीव्हीचा राहिला नाही धाक;चोरटे कॅमेऱ्यात कैद

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे.किलज गावावर सीसीटीव्हीची नजर असताना देखील चोरट्यानी चोरीचं मोठं धाडस केले आहे.किलजमधील भर चौकातील २ किराणा दुकाने तर एक हॉटेल वर चोरट्यानी डल्ला मारला आहे.दुकान मालकांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये चौकातील राजेंद्र मर्डे यांच्या किराणा दुकानातील किराणा साहित्य तसेच रोख रक्कम अंदाजे १० ते १५ हजार आणि प्रसाद मोजगे यांच्या दुकानात किराणा साहित्य तसेच रोख रक्कम ६००० तसेच चौकातील एका हॉटेलमधील साहित्य व रोख रक्कम २५०० चोरट्यानी लंपास केली आहे.विशेष म्हणजे किलज गावात सीसी कॅमेऱ्याची नजर असून सुद्धा चोरट्यानी हे धाडस केले आहे.ह्या अगोदर ही चोरीच्या घटना घडल्या आहेत.चोरट्यानी चोरी केलेली दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.चोरट्यानी चोरी करून पैशाचे गल्ले हे गावच्या बाहेर फेकून दिले आहेत.गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असताना देखील चोरट्यानी हे धाडस केलंच कस असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top