तुळजापूर :- 4 फेब्रुवारी 2022 वार शुक्रवार रोजी सायंकाळी ठीक चार वाजता तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद येथील सभागृहात मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांचा शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींना व संस्थाचालकांना कळविण्यात येते की आपल्या काही समस्या असतील तर त्याची सोडवणूक करण्यात येणार आहे तरी आपल्या समस्या घेऊन हजर राहावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंखे व तालुका अध्यक्ष सुहास वडणे यांनी केले आहे.