युवराज नळे यांच्या अभंग पंढरी चे प्रकाशन

0

उस्मानाबाद :-  येथील साहित्यिक युवराज नळे यांचे पाचवे पुस्तक "अभंग पंढरी" चे प्रकाशन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. पंडितराव नळेगावकर, ह.भ.प. ॲड.पांडुरंग लोमटे महाराज, समग्र प्रकाशनचे देवीदास पाटील, वर्षा नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.


    यावेळी बोलताना आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी पुस्तकातील काही अभंग रचना वाचून दाखवत समाज प्रबोधनासाठी यातील अनेक अभंग उपयुक्त असल्याचे सांगितले. तर ह.भ.प. ॲड. पांडुरंग लोमटे महाराज यांनी पुस्तकातील अभंगांचे विश्लेषण करून, राजकारणात सक्रिय असूनही युवराज नळे यांचे साहित्यिक योगदान मोलाचे असून "अभंग पंढरी" मधील एक एक अभंग रचना ही अनुभवाची शिदोरी आहे असे प्रतिपादन केले. 
जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, ॲड.पंडीतराव नळेगावकर,प्रकाशक देविदास पाटील यांनीही आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजेंद्र अत्रे, पं.दिपक लिंगे, राजसिंह राजेनिंबाळकर, अर्चना अंबुरे, पूजा देडे, डॉ.रुपेशकुमार जावळे, सुदेश माळाळे, विजय गायकवाड, बालाजी तांबे, बाळासाहेब घेवारे, मीना महामुनी, शेषनाथ वाघ, मुकुंद पाटील राजेश कारंडे, विजय यादव, यांचेसह साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली डोंगरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top