उस्मानाबाद (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणेकडून जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी आणि त्याचे समर्थक मनुवादी संघटना सत्तेत असल्याने त्याचा गैरवापर करून समाजात जातीय वाद आणि दुही निर्माण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रपती यांना उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनात केलेला आहे. यामध्ये नमूद केले आहे की केंद्रीय सरकार ईडी, एनआयए, सीबीआय या यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. देशाच्या सर्वोच्च संविधानिक राष्ट्रपती पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपतींनी देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लक्ष द्यावे अशी विनंती निवेदनाच्या शेवटी केली आहे.
या निवेदन दिल्यानंतर कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी एकत्र येऊन बोंबाबोंब आंदोलन केले.
या निवेदनावरती मसुद शेख, अयाज शेख,अन्वर शेख,संजय निंबाळकर,संजय दुधगावकर, अमित शिंदे, प्रदीप मुंडे, नंदकुमार गवारे,पृथ्वीराज चिलवंत,असद पठाण,बाबा मुजावर, इलियास पिरजादे,एजाज काझी,अनिकेत पाटील, जयंत देशमुख,बिलाल तांबोळी,गणेश खोचरे, शेखर घोडके,रणधीर इंगळे, महादेव माळी कुणाल निंबाळकर अजयकुमार कोळी,मसूद काझी, वाजीद पठाण,विशाल शिंगाडे, ॲड मनीषा पाटील, ऋषिकेश चव्हाण, योगेश सोन्ने पाटील बिलाल तांबोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.