महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारीस जिल्ह्यातील १९ उपकेंद्रावर होणार - MPSC Paper Center Osmanabad
उस्मानाबाद,दि.23 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा,अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा उस्मानाबाद जिल्ह्यातील 19 उपकेंद्रांवर शनिवार दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या एका सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. एकूण 5 हजार 736 परिक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा उपकेंद्र असे: उपकेंद्र क्र.01 श्रीपतराव भोसले हायस्कूल (तळमजला)-240, उपकेंद्र क्र.02 श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज (पहिला मजला)-264, उपकेंद्र क्र.03 श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज (दुसरा मजला)-480, उपकेंद्र क्र.04 श्रीपतराव भोसले हायस्कूल (तिसरा मजला)-480, उपकेंद्र क्र.05 श्रीपतराव भोसले हायस्कूल (आण्णा ई टेक्नो)-336, उपकेंद्र क्र.06 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (पहिला व दुसरा मजला) (पार्ट – B)-384, उपकेंद्र क्र.07 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (नवीन इमारत)-240, उपकेंद्र क्र.08 छत्रपती शिवाजी हायस्कूल (तांबरी विभाग)-384, उपकेंद्र क्र.09 अभिनव इंग्लिश स्कूल (भानू नगर)-288, उपकेंद्र क्र.10 विद्यामाता हायस्कूल (सांजा चौक,औरंगाबाद बायपास रोड)-240, उपकेंद्र क्र.11 शासकीय तंत्रनिकेतन (तुळजापूर रोड)- 240, उपकेंद्र क्र.12 श्री श्री रविशंकर विद्यामंदिर(तळ मजला,जाधववाडी रोड, पार्ट-A)- 288, उपकेंद्र क्र.13 श्री श्री रविशंकर विद्यामंदिर (तळ मजला, जाधववाडी रोड, पार्ट-B)- 312, उपकेंद्र क्र.14 तेरणा कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (एमआयडीसी, औरंगाबाद रोड)- 216, उपकेंद्र क्र.15 जिल्हा परिषद कन्या प्रशाला (शहर पोलिस स्टेशनजवळ)- 288, उपकेंद्र क्र.16 आर्य चाणक्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (समर्थ नगर,सांजा चौक)-240, उपकेंद्र क्र.17 तेरणा पब्लिक स्कूल (बार्शी नाक्याजवळ, उंबरे कोटा)- 336, उपकेंद्र क्र.18 पोदार इंटरनॅशनल स्कूल (आर.डी.नगर, विकास नगरच्या पुढे, सोलापूर बायपास रोड)-240, उपकेंद्र क्र.19 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (तळमजला, मेन रोड, पार्ट-A)- 240.
परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींनी स्वत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेस येताना प्रवेश पत्रासोबतच स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक ओळखत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी आणि ती स्वत:च्या स्वाक्षरीसह समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळा शाईचा पाईन्ट पेन,मूळ ओळखपत्र आणि त्याची छायाकिंत एक प्रत इत्यादी साहित्य सोबत आणण्याची मुभा राहील.या व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य उमेदवारांना सोबत बाळगता येणार नाही.उमेदवारांना एकदा परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत केंद्रा बाहेर जाता येणार नसल्यामुळे उमेदवारांनी पाणी बॉटल सोबत आणावी
कोविड -19 विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार उमेदवारांना वैध प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षेकरिता प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन,टेजर,इतर दूरसंचार साधणे,इलेक्टॉनिक उपकरणे अथवा दूरसंचारासाठी वापरण्यात येणारी कोणतेही संपर्क साधणे, पुस्तके,पेपर्स, अथवा परिगणक (कॅलक्युलेटर) इत्यादी प्रकारचे अनाधिकृत साहित्य जवळ बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.या बाबी परीक्षार्थींच्या जवळ असल्याचे निर्देशनास आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा उपकेंद्रावर पोहोचावे.विलंबाने आलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत परीक्षेला बसता येणार नाही अथवा या संदर्भात आयेागाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद ई-मेल आयडी यापैकी कोणताही एक तपशिल नमूद करून प्रवेश प्रमाणपत्राचा तपशिल पाहाता येईल.तसेच प्रवेश प्रमाणपत्र डॉऊनलेाड व प्रिंट करिता येईल.परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डॉऊनलोड व प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश पत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.या शिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.परीक्षेच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या,अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
कोविड -19 विषाणू प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर आयेागाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपायायोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना,प्रवेश पत्रावरील दिलेल्या सूचनांचे परीक्षेच्या वेळी शारिरीक तथा परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाची कारवाई, उपयोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.या सूचनांचे उल्लघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वच्छाधिकारानुसार,तसेच प्रचलिंत नियम,कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
या परीक्षेसाठी जिल्हयातील 19 उपकेंद्र परिसरामध्ये दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.त्याच प्रामणे या उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरामधील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी,टायपिंग सेंटर, एस.टी.डी बुथ, ध्वनीक्षेपक कॉम्पीटर सेंटर,इंटरनेट कॅफे,इ माध्यमे बंद राहतील.तसेच उप केंद्रावर परीक्षा अर्थी नियुक्त अधिकारी/कर्मचारी,शाळेचे मुख्याध्यापक /शिक्षक/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणासही (परीक्षार्थीचे नातेवाईक यांनाही ) प्रवेश असणार नाही. या परीक्षा उपकेंद्र परिसरांमध्ये मोबाईल फोन,सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यास कोणतही अडचण उद्भभवल्यास उमेदवारास आयोगाच्या (contact)-secretary@mpsc.gov.in व supporp.online@mpsc.gov.in या ई-मेल वर अथवा 1800 -1234-275 किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल.असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिवकुमार स्वामी, जिल्हा केंद्र प्रमुख यांनी कळविले आहे.