छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त MH25 HELPING HANDS आयोजित online जिल्हा स्तरीय स्पर्धा संपन्न
कळंब:-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त कोरोना परिस्थितीची जाण ठेऊन MH25 Helping Hands या संस्थेच्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२२ घेण्यात आली या स्पर्धे मध्ये जिल्हा भारातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला
१८ फेब्रुवारी पर्यंत count केलेले views अनुसार १९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला या स्पर्धे मध्ये
७,३५८ views साधुन रांजणी गावातील प्रियांका जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे तर
४,९९८ views साधुन जायफळ गावातील संगीता गुताडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे आणी
४,२२० views साधुन मोहा गावातील श्रावणी वीर यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे
सर्व विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र व पारितोषिक रक्कम ऑनलाईन देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेता स्पर्धकांकडे त्यांच्या हक्काचे winner prize आज सुपूर्द केले आहेत आपल्या सर्वांचा सहभाग हा खरच कौतुकास्पद होता MH 25Helping Hands हि संस्था उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजवंतांच्या मदतिसाठी नेहमीच तत्पर असते या पुढेही आपण सर्वजण MH 25 Helping Hands सोबतचा स्नेह कायम ठेवाल अशी अपेक्षा.संस्थपक अध्यक्ष शुभम राखूनडे यांनी केली आहे या स्पर्धेचे संयोजन विपुल देशमुख, बाजीराव वाघमारे, बाळासाहेब बरकसे ,अशोक जगताप ,कुलदीप गायकवाड, स्वप्नील महाजन, सौरभ खंडाळे,वैभव पारवे,वैभव कुलकर्णी आदींनी केले.