google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतीतील विद्युत पुरवठाच्या वेळेत बदल करा : सांजा येथील शेतकऱ्यांचे ऊर्जा मंत्र्यांना निवेदन

शेतीतील विद्युत पुरवठाच्या वेळेत बदल करा : सांजा येथील शेतकऱ्यांचे ऊर्जा मंत्र्यांना निवेदन

0
उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील शेतातील विद्युत पुरवठाच्या नियम व वेळेमध्ये बदल करण्याची मागणी सांजा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे 

    दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की सांजा येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून असून शेतामधील पिकांना पाणी सोडण्यासाठी महावितरण कडून रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चा वेळ शेतीतील विद्युत पुरवठा करण्यासाठी दिलेला आहे दिलेला वेळ हा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा असून जीवितास धोका संभवू शकतो तरी दिलेल्या रात्रीच्या वेळेमध्ये बदल करून दिवसाला ३ ते ४ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी सांजा येथील बहुतांश शेतकऱ्यांनी केली आहे 


    दिलेल्या निवेदनावर सांजा  गावातील ५२ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन देते वेळी सांजा येथील माजी सरपंच संजय सूर्यवंशी,नागेश हंगरगेकर,राकेश कचरे,बालाजी सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top