उस्मानाबाद मध्ये स्ट्राँबेरीची शेती मराठवाडयात उस्मानाबाद तालुक्यात शेतकऱ्याचा पहिला यशस्वी प्रयोग केला , खजूर एप्पल सोबतच आता उस्मानाबाद मध्ये स्ट्रॉबेरीची शेती सुरू झाली आहे
जसे की आपल्याला माहीत आहे आतापर्यंत आपण पाहत आलोय थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे स्ट्राँबेरीची शेती मोठया प्रमाणात पहायला भेटते पण याच स्ट्राँबेरीची शेती आता उस्मानाबाद तालुक्यात तोरंबा गावातील सचिन सुर्यवंशी व वैभव सुर्यवंशी या युवा शेतकऱ्यांनी या स्ट्राँबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय केवळ पाऊण एकर मध्ये ६ लाखाचे उत्पन्न त्याना मिळालय तर पुढे २ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे
सातारा येथील मित्रांचे मार्गदर्शन आणि तेथील व्हिंटर डाऊन व ब्रिलेंसा या जातीच्या स्ट्राँबेरीच्या मुळया ४९ रुपये प्रमाणे ७०० आणल्या त्याचे १० हजार स्ट्राँबेरीचे रोप बनवले. सचिन सुर्यवंशी यांनी १२ गुंटयात चार हजार सहाशे स्ट्राँबेरीचे रोपे मलचिंग कापडाच्या आधारे लावली तर वैभव सुर्यवंशी यांनी १७ गुंटयात पाच हजार चारशे स्ट्राँबेरीचे रोप मलचिंगच्या सहाय्याने लावली आहे प्रत्येकी ७० हजार रुपये खर्च दोघांनी केलाय. सोलापुर लातुर उस्मानाबाद येथील मार्केट मध्ये स्ट्राँबेरीची विक्री त्यांनी केली आहे. आता पर्यंत दोघांना तीन तीन लाख रुपयाचे उत्पन्न भेटलय तर पुढच्या तोडयात दोन लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे