उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी चोरी , तिन ठिकाणी मारहाण

0





मारहाण 

भूम पोलीस ठाणे : वाकवड, ता. भूम येथील ग्रामस्थ- तात्याराम सर्जेराव मासाळ हे कुटूंबीयांसह दि. 06- 07.02.2022 दरम्यानच्या रात्री आपल्या घरात झोपलेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी-कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 59 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, दोन जोड चांदीचे पैजण व 20,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या तात्याराम मासाळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

आनंदनगर पोलीस ठाणे : पोस्ट कॉलनी, उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- राजश्री कन्हैय्या मदनुरकर, वय 48 वर्षे या कुटूंबीयांसह दि. 07.02.2022 रोजी 03.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेल्या होत्या. यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी मदनुरकर यांच्या घराची कडी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कन्हैय्या मदनुरकर यांनी त्या चौघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कन्हैय्या यांना कोयता, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच श्रीमती राजश्री यांसह त्यांच्या मुलींस ठार मारण्याची धमकी देउन व शस्त्राचा धाक दाखवून घरातील 26,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने व 4,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजश्री मदनुरकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी पोलीस ठाणे : तामलवाडी येथे असलेल्या इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या यंत्रणेतील आयडीआय बीटीएस मधील डीटीआरयु 900 चे प्रत्येकी 2,000 ₹ किंमतीचे एरिक्सॉन ब्रँडचे 6 कार्ड व सीडीयुजी 9 चे 3 कार्ड असे एकुण 9 कार्ड दि. 03.02.2022 रोजी 01.00 ते 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव दवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



मारहान.

येरमाळा पोलीस ठाणे : बावी, ता. वाशी येथील श्रीमंत छबु शिंदे यांनी दि. 06.02.2022 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गल्लीत पुर्वीच्या वादावरुन भाऊ- वसंत शिंदे यांना शिवीगाळ करुन डोक्यात कुऱ्हाड मारुन त्यांना जखमी केले. यावेळी वसंत यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलासही श्रीमंत यांनी शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वसंत शिंदे यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तुळजापूर पोलीस ठाणे : तिर्थ (खुर्द), ता. तुळजापूर येथील रामदास महादेव पवार हे पत्नी व मुलासह दि. 06.02.2022 रोजी 18.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावकरी- निलेश कानडे, राम कानडे, रोहीत कानडे, सुलोचना कानडे, सविता कानडे, उमाकांत कानडे, चंद्रकांत कोठावळे या सर्वांनी पवार राहत असलेल्या भुखंड मालकीच्या कारणावरुन पवार यांच्या घरासमोर जाउन रामदास पवार यांसह त्यांची पत्नीस व मुलगा- नेताजी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, खोऱ्या, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रामदास पवार यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 148, 149, 324, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

शिराढोन पोलीस ठाणे : कळंब तालुक्यातील वाटवडा ग्रामस्थ- येवतकर कुटूंबातील अभिजीत, बाळु, सुहास, आशिष, महानंदा, सुलभा या सर्वांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 06.02.2022 रोजी 09.00 वा. सु. गावकरी- परमेश्वर बप्पा आगळे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर आगळे यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top