उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 07.02.2022 रोजी 8 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. या छाप्यादरम्यान 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1) मुरुम पोलीसांनी 2 ठिकाणी छापे मारले असता यात नाईकनगर, मुरुम येथील सतिष जाधव हे आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर येणेगुर, ता. उमरगा येथील अनिल गाडेकर हे येणेगूर शिवारात 26 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना पथकास आढळले.
2) ढोकी पोलीसांनी तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथे 2 ठिकाणी छापे मारले असता ग्रामस्थ- कलाबाई शिंदे व आश्विनी शिंदे या दोघी गाव शिवारात देशी- विदेशी दारुच्या बाटल्या व हातभट्टी दारु असा 44,500 ₹ किंमतीचा माल बाळगलेल्या असतांना पथकास आढळल्या.
3) रुईभर, ता. उस्मानाबाद येथील राजकुमार कोळी हे बरमगाव (बु.) शिवारात 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 34 बाटल्या बाळगलेले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
4) पारधी पिढी, भुम येथील आशाबाई पवार या आपल्या घरासमोर 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना भूम पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
5) जळकोट, ता. तुळजापूर येथील विनोद लोखंडे हे गाव शिवारात 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 11 बाटल्या बाळगलेले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.
6) येरमाळा, ता. कळंब येथील अतुल शिंदे हे गावातील एका पत्रा शेडसमोर 5 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.