बेवारस आढळलेल्या १२८ मोटारसायकलचा लिलाव संपन्न

0


उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : गेल्या काही वर्षात उस्मानाबाद (श.) पोलीसांना हद्दीमध्ये अनेक मोटारसायकल बेवारस स्वरुपात आढळल्या होत्या. त्यातील बहुतांशी मोटारसायकल या अत्यंत जुन्या असल्याने त्यांचा सांगाडा, इंजीन क्रमांक अस्पष्ट झालेला असल्याने त्या वाहन मालकांची अभिलेखावरुन ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते. पोलीसांनी प्रादेशिक परिवहन विभागातील अभिलेखावरुन प्राप्त माहितीच्या आधारे संबंधीत वाहन मालकांस नमूद वाहने ताब्यात घेण्यास अनेकदा कळविले असतांनाही ती वाहने संबंधीतांनी ताब्यात घेतली नाहीत.

            या मोटारसायकल पुन्हा वापरात न आनण्याच्या अटीवर एक गठ्ठा स्वरुपात एका खरेदीदारास भंगारसाठी विकण्यात आल्या असून 73 मोटारसायकलचा जाहीर लिलाव गेल्या सप्ताहात तर आज दि. 08.02.2022 रोजी 55 मोटारसायकलचा असा एकुण 128 मोटारसायकलचा जाहीर लिलाव करण्यात आला. यातून एकुण 3,62,500 ₹ रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top