उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी रस्ता अपघातात दोन ठिकाणी मारहाण

0


उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी रस्ता अपघातात दोन ठिकाणी मारहाण 


रस्ता अपघात.

उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : कोठाळवाडी, ता. कळंब येथील वासुदेव संपत्ती शिंदे हे नातेवाईकांसह दि. 23.02.2022 रोजी 14.30 वा. सु. येडशी येथील सोनेगाव चौकातील रस्त्याने कार क्र. एम.एच. 25 आर 5344 ने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. आर.जे. 14 जीके 6224 ही निष्काळजीपने चालवल्याने वासुदेव शिंदे चालवत असलेल्या नमूद कारला पाठीमागून धडकला. या अपघातात शिंदे यांच्या कारचे आर्थिक नुकसान झाले असून या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन ट्रकसह पसार झाला. अशा मजकुराच्या वासुदेव शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

आनंदनगर पोलीस ठाणे : रामकृष्ण कॉलनी, उस्मानाबाद येथील डॉ. किशोर ज्ञानेश्वर काकडे, वय 37 वर्षे हे दि. 16.02.2022 रोजी 20.45 वा. सु. सांजा गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 5544 ही चालवत जात होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने विना नोंदणीक्रमांकाची काळ्या व लाल रंगाची बजाज पल्सर ही चुकीच्या दिशेने दिष्काळजीपने चालवल्याने काकडे यांच्या मोसाला समोरुन धडकल्याने किशोर काकडे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या किशोर काकडे यांनी दि. 23.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

नळदुर्ग पोलीस ठाणे : राजेशनगर पारधी पिढी, ढोकी येथील कलाप्पा राजेंद्र चव्हाण यांसह 10 व्यक्त्तींच्या गटाचा खामकरवाडी, ता. वाशी येथील आक्काबाई अन्सर काळे यांसह 14 व्यक्तींच्या गटाशी चिवरी, ता. तुळजापूर येथील महालक्ष्मी देवीच्या मंदीराच्या आवारात दि. 22.02.2022 रोजी 17.00 ते 17.30 वा. दरम्यान किरकोळ कारणावरुन हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटांती स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी गटांतील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने चाकु, सुरी, बियरच्या बाल्या, दगड, काठीने मारहान करुन किरकोळ व गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या कलाप्पा चव्हाण व आक्काबाई काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 504, 143, 147, 148, 149 सह मुंबई पोलीस अधिनियम कलम- 135 अंतर्गत परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

शिराढोन पोलीस ठाणे : माळकरंजा, ता. कळंब येथील भास्कर मारुती कराड व लता कराड या दाघा पती- पत्नींनी सामाईक बांध फोडल्याच्या कारणावरुन दि. 19.02.2022 रोजी 14.00 वा. सु. माळकरंजा शेत शिवारात भाऊबंद- विश्वनाथ मारुती कराड यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विश्वनाथ कराड यांनी दि. 23.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top