हर्ष नागराज झिंगाडेची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी

0

लोहारा  /  प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील हर्ष नागराज झिंगाडे या भावसार समाजातील तरुण बांधवांची  निर्घृणपणे धारधार शस्त्राने अमानुषपणे हत्या करण्यात आली असून ती अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे, संबंधित आरोपींवर तात्काळ कडक  कारवाई करावे  अशा मागणीचे निवेदन लोहारा भावसार समाज यांच्या वतीने  तहसीलदार संतोष रुईकर,याना निवेदन देण्यात आले आहे,या भावसार समाज अध्यक्ष शिवराज झिंगाडे, उपाध्यक्ष दत्तात्रय माळवदकर, सचिव नंदकुमार झिंगाडे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, पत्रकार सुमित झिंगाडे,अक्षय माळवदकर, सुरेश झिंगाडे, किशोर झिंगाडे, संतोष माळवदकर, सूरज पुकाळे,नागेश माळवदकर, बाळकृष्ण झिंगाडे, शहाजी जाधव,विशाल मिटकरी, महेश कुंभार, बालाजी चव्हाण, शंकर जाधव,  यांच्यासह या निवेदनावर  समाज बांधवाच्या सह्या आहेत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top