google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात १८१ बूथवर सोय

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात १८१ बूथवर सोय

0

 उस्मानाबाद,दि.25(जिमाका):- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार,दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हा शहरी विभागात एकूण 181 लसीकरण बूथ (केंद्र) ची सोय करण्यात आली आहे. अनुक्रमे उस्मानाबाद येथे 59, तुळजापूर-23, नळदुर्ग-22, उमरगा-26, मुरुम-15, कळंब-16, भूम-8, परंडा-12 याप्रमाणे लसीकरण बूथ केंद्रांची सोय करण्यात आली आहे.


         या शिवाय बसस्थानक, बाजार, बांधकाम, टमटम स्टँड, सेल्स आदी ठिकाणी ट्रान्झिट टीम ची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा सर्व पालकांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून शून्य ते पाच वर्षातील 38 हजार 42 सर्व बालकांना पोलिओचे डोस पाजून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील यांनी केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top